इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’च्या वतीने दोन दिवसांचा ‘प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश ६९ वा प्रकटोत्सव’ ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘श्री भक्तवात्सल्याश्रम’ (अन्नपूर्णा रोड) येथे साजरा होणार आहे.
शनिवार, ८ फेब्रुवारीच्या सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत स्तवनमंजिरी आणि रामानंद बावनी पाठ, दुपारी १२ वाजता प्रसाद, तर सायंकाळी ६ ते ८ मध्ये श्री. सार्थक संगमनेरकर अन् श्री. यश फपूनकर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर श्री. हर्षल पाटणकर, तर तबल्यावर श्री. वेदांत लकरस साथ देणार आहेत.
रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत श्री. सत्यनारायण पूजन, १० ते १२ मध्ये श्रींच्या पादुकांवर लघुरुद्राभिषेक आणि नंतर प्रसाद, असे सकाळच्या कार्यक्रमाचे स्वरूप असेल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भक्तराज महिला मंडळ, इंदूरच्या वतीने भजनाचा कार्यक्रम, ६ ते ८ या वेळेत नैमित्तिक सायं प्रार्थना आणि त्यानंतर पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता छप्पन भोग, आरती आणि महाप्रसाद असेल.
श्रींच्या प्रकटोत्सवातील सर्व कार्यक्रमांना आपण आप्त आणि इष्टमित्रांसहित सहभागी होऊन आपला आनंद वृद्धिंगत करावा, अशी विनंती आयोजन समितीने केली आहे.
प.पू. रामानंद महाराज निर्वाणोत्सव पुढील महिन्यात रविवार, ९ मार्चला श्री भक्तवात्सल्याश्रमात साजरा होणार आहे.