प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.

भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत रूप म्हणजे स्वामी विवेकानंद ! – प्रा. अरुण मर्गज

विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्‍वबंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचे वैश्‍विक सत्य, धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे, ते खरे शिक्षण !

स्वामी विवेकानंद यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

आज स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (दिनांकानुसार) !
‘तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.’  -स्वामी विवेकानंद

जे.एन्.यू.ला ‘स्वामी विवेकानंद विश्‍वविद्यालय’ असे नाव द्या !  

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने थेट नाव पालटून ते घोषित केले पाहिजे ! हिंदुद्वेषी नेहरू यांचे नाव असलेल्या सर्वच संस्थांची नावे पालटून त्यांना हिंदूंच्या संतांची नावे देण्यात यावीत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !