भारतात आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांचा विस्तृत प्रमाणावर प्रचार व्हायला हवा !

भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे, असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे…

प्रत्येकात असलेले ईश्वरत्व जागृत करा !

वेदांताची प्रकाशदायी, जीवनदायी तत्त्वे घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा; मग तुम्हाला मिळालेल्या यशाचे प्रमाण अल्प असो वा अधिक असो, तुम्हाला हे समाधान लाभेल की, तुम्ही स्वतःचे जीवन एका महान आदर्शासाठी व्यतित केले

स्वामी विवेकानंद यांचे जातीसंस्थेविषयीचे मत !

जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातीसंस्था पाहिली आहे; परंतु भारतात जातीसंस्थेची जी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे, तसा इतरत्र कुठेही आढळत नाही.

भारताला आवाहन !

‘‘भारताची माती माझा स्वर्ग आहे, भारताच्या कल्याणातच माझे कल्याण आहे.’’ रात्रंदिवस हीच प्रार्थना कर, ‘‘हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला ‘मनुष्यत्व’ दे. माते, माझी दुर्बलता, भीरुता (भित्रेपणा) दूर कर. मला ‘मनुष्य’ बनव.’’

भारतासमोर असलेला धोका !

गोर्‍या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?

आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा !

आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा.

प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू यांचे महत्त्व

जिथे प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.

जुन्या वादविवादांचा आणि कलहांचा त्याग करा !

आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल. 

आध्यात्मिकतेचा अभाव वाढत असल्याचे लक्षण !

हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.

स्वामी विवेकानंद यांचे तरुणांना कार्यप्रवण करण्याविषयीचे विचार

लोखंड जोवर तापून लाल झालेले आहे, तोवर त्याच्यावर घणाचे घाव घाला. आळशासारखे बसून काम होणार नाही. मत्सर आणि अहंकार यांना कायमचे दूर करा. या आणि आपल्या सार्‍या शक्तीनिशी कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष कर्मक्षेत्रात उतरा.