बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !

‘टुकडे आणि तैमुर गँग’ला दणका !

जे.एन्.यू. विद्यापिठातील कित्येक अपप्रकार आणि देशद्रोही वातावरण दाखवण्याचे धैर्य या मालिकेच्या निर्मार्त्यांमध्ये नाही. कलेच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांच्या विडंबनासमवेतच आता देशद्रोही विचारसरणीचा उदो उदो दाखवण्याची नवरूढी चित्रपट आणि वेब सिरीज यांत निर्माण झाली आहे. 

देशद्रोह्यांचा बंदोबस्त करा !

शेहलावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेल्यावर सर्व स्तरांतून तिच्या अटकेची मागणी होऊन ही अटक केली गेली नाही. अशाना मोकाट सोडणे, हे देशासाठी घातक आहे. ही देशद्रोही कीड वेळीच रोखायला हवी. तसेच तिच्याप्रमाणे देशासाठी धोकादायक ठरणार्‍या सर्व देशद्रोह्यांना कारागृहात डांबायला हवे, ही देशप्रेमींची अपेक्षा !

जे.एन्.यू.ची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग ! – शेहला रशीदच्या वडिलांचा आरोप

पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे; कारण जेएनयूमधील साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांना आणि नेत्यांपैकी काही जणांना अशाच प्रकरणांत अटक करण्यात आलेली आहे. स्वतः वडीलच मुलीविषयी असा आरोप करत असतील, तर तो अधिकच गंभीर !

जे.एन्.यू.ला ‘स्वामी विवेकानंद विश्‍वविद्यालय’ असे नाव द्या !  

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने थेट नाव पालटून ते घोषित केले पाहिजे ! हिंदुद्वेषी नेहरू यांचे नाव असलेल्या सर्वच संस्थांची नावे पालटून त्यांना हिंदूंच्या संतांची नावे देण्यात यावीत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

नक्षलवादाचे पाठीराखे !

केंद्रातील सरकारने शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालटण्याचे प्रयत्न गतीमानतेने करावेतच. नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.