(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी

(म्हणे) ‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमायाचना केल्याने स्वातंत्र्यसैनिकांसमवेत त्यांचे छायाचित्र लावणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान !’

  • शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुत्सद्दीपणा न जाणार्‍या काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्म कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !
  • भारताच्या फाळणीला आणि १० लाख हिंदूंच्या कत्तलीसाठी उत्तरदायी असणार्‍या गांधी आणि नेहरू यांची छायाचित्रे देशातील सर्वच सरकारी कार्यालयांतून काढून टाकण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केली, तर चुकीचे ठरू नये !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील काँग्रेसचे नेते दीपक सिंह यांनी विधान परिषदेच्या दालनात लावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र काढून टाकण्याची मागणी सभापतींकडे पत्र लिहून केली आहे. ‘इंग्रजांची क्षमायाचना करणार्‍या सावरकर यांचे छायाचित्र स्वातंत्र्यसैनिकांसमवेत लावणे हा त्यांचा अवमान आहे. हे छायाचित्र भाजपने त्याच्या कार्यालयात लावले पाहिजे’, असे सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे.

दीपक सिंह यांनी पत्रात मांडलेली सूत्रे

१. सावरकरांनी अंदमानातील कारागृहातील काही मासानंतरच इंग्रजांना पत्र लिहून ‘ब्रिटीश सरकारने मला क्षमा करावी. मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून स्वतःला वेगळे ठेवेन आणि इंग्रजांविषयी प्रामाणिक राहीन’, असे म्हटले होते. यानंतर ते कारागृहातून बाहेर आले आणि त्यांना भारताच्या विरोधात मोहीम राबवली. (सावरकरांनी नाही, तर काँग्रेसवाल्यांनीच भारताच्या विरोधात कार्य केले आहे. काश्मीरचा प्रश्‍न असो किंवा चीनचे आक्रमण यांमुळे भारताचा सहस्रो चौ. किलोमीटर भूभाग चीन आणि पाक यांच्या घशात जाण्याला काँग्रेसच उत्तरदायी आहे, हाच इतिहास आहे ! – संपादक)

२. महंमद आली जिना यांच्या द्विराष्ट्राची भूमिका सावरकरांनी कर्णावती येथील हिंदु महासभा अधिवेशनामध्ये मांडली होती. (याला कोणताही पुरावा नाही, उलट काँग्रेसने विशेषतः गांधी-नेहरू यांनीच जिना यांची ही भूमिका स्वीकारून भारताच्या फाळणीला मान्यता दिली, हा इतिहास आहे !  – संपादक)

( सौजन्य : ABP NEWS )

३. सावरकरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या विरोधात इंग्रजांना साहाय्य केले. (काँग्रेसचा आणखी एक हास्यास्पद दावा ! ‘नेताजी बोस यांनी सशस्त्र सैन्य स्थापन करून कार्य करावे’, हा सल्ला सावरकरांनीच त्यांना दिला होता, हा इतिहास आहे. याच्या उलट नेताजी बोस काँग्रेसमध्ये असतांना त्यांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करून त्यांना काँग्रेस सोडण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर नेताजी बोस जिवंत असल्याच्या शक्यतेने ते परत भारतात येऊ नयेत, यासाठी नेहरू यांनी शक्य ते सर्वच प्रयत्न केले, असे म्हटले जाते. यासाठी काँग्रेसवाल्यांनाच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक) 

विधानपरिषदेत सावरकरांच्या फोटोवर कॉंग्रेसचा आक्षेप, (म्हणे) स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला !

दीपक सिंह यांचे पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा –

(चित्र सौजन्य : झी न्यूज)