केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !

  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असे करावे लागते, हे भारतियांना लज्जास्पद !
  • नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !
  • कुठे विदेशात जाऊन सैन्य उभे करून ब्रिटिशांना जेरीस आणणारे, तसेच अंदमान आणि निकोबर स्वतंत्र करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, तर कुठे काश्मीरमधील मूठभर आतंकवाद्यांना गेल्या ३ दशकांत नष्ट न करू शकणारे आतापर्यंतचे भारतातील सर्वपक्षीय शासनकर्ते !

नवी देहली – आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २३ जानेवारीला असलेली जयंती यावर्षीपासून ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे.


( सौजन्य : ABP NEWS)

सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा शुभारंभ २३ जानेवारीला कोलकाता येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल येथून होणार आहे.