स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करण्याच्या शासन आदेशावर कार्यवाही व्हावी ! – हिंदु महासभेची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

पाश्‍चिमात्य शक्तींनी चुकीचा इतिहास आमच्यावर लादला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आमच्या इतिहासातील बहुतांश भाग हा पाश्‍चिमात्यांच्या प्रचाराचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या प्रकाराला आव्हान दिल्याने त्यांच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. त्यांच्या विरोधात खोटी माहिती प्रसारित करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतच्या वर्गाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे अशा प्रकारे संस्कृत भाषा शिकवण्यात येईल.

क्रांतीकारकांच्या बलीदानाच्या पुण्यस्मरणाने अखंड भारताच्या निर्मितीसाठी तरुणांची मानसिकता घडेल ! – डॉ. अजय कुलकर्णी, महासचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर समिती

क्रांतीकारकांच्या बलीदानाचे पुण्यस्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झाले पाहिजे. तसे झाले, तरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अखंड भारताचे जे स्वप्न होते, त्याच्या निर्मितीसाठी आजच्या तरुणांची मानसिकता घडेल.

‘सनातन प्रभात’ने ‘युद्ध विशेषांका’द्वारे हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी केली समर्पित ! – विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा

‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने २३ एप्रिल या दिवशी ‘युद्ध विशेषांक’ प्रसिद्ध करून हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी समर्पित केली. यासाठी ‘सनातन प्रभात’ यांचे मनापासून अभिनंदन !

युद्धसज्ज भारतच बलवान राष्ट्र होईल ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

हे द्रष्ट्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्राने युद्धसज्ज रहाण्याचे विचार आजही उपयोगी !

चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवणे भारताला महागात पडले !

चीन आक्रमकपणे कारवाया करत असतांना आमचे डोळे का उघडले नाहीत ? भारताने नेमकी चूक कुठे केली ? भारताने तिबेटला चीनचा भाग समजण्याची चूक केली आणि पंचशीलच्या सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवला. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण युद्धाची कूटनीती विसरलो. परिणामी भारताचे स्वतःच्या लष्करी सिद्धतेकडे दुर्लक्ष झाले !

सैन्यभरतीची सक्ती !

राष्ट्रप्रेम जागृत ठेवून राष्ट्रसेवा करणाऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा ।, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांसारख्या अनेकांचा वारसा राष्ट्राला लाभला आहे. त्यांचा आदर्श जोपासूया आणि सरकारच्या योजनेद्वारे राष्ट्रकर्तव्य पार पाडूया !

हिंदु नववर्षाचा प्रारंभ वीर सावरकरनिर्मित भगव्या ध्वजाची गुढी उभारून करा !

हिंदु धर्मध्वजाची गुढी उभारून वीरता, साहस आणि धर्माच्या प्रति निष्ठा दर्शवावी. यामुळे हिंदूंवर वक्रदृष्टी टाकणाऱ्यांसाठी चेतावणीही ठरेल. ‘शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो, धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो’ – स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून शौर्य जागृत करण्याची आवश्यकता ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

आपल्यामध्ये शौर्य आधीपासूनच आहे; पण ते सुप्तावस्थेत आहे. आता त्याला जागृत करूया. आता क्रांतिकारकांचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांसाठी वेळ देऊया.