गोव्याची खरी ओळख जगभर पोचवणे आवश्यक ! – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

गोव्याच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून तो लोकाभिमुख करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासारखे देशप्रेम स्वतःतही जागृत करूया ! – स्वाती एम्.के., हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीद्वारे बेंगळुरू (कर्नाटक) येथे पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा वृत्तांत . . .

‘ऑनलाईन’ राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनात साधक अधिवक्त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षी ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन घेण्यात आले.त्या वेळी काही साधक अधिवक्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती देत आहोत . . .

शिवप्रताप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भव्य कार्यास हिंदूंचे संघटन करण्या आपण सिद्ध होऊया !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।

‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।
हिंदुराष्ट्र पण अमर असे हे अनादि काळहि सांगतसे
अमरत्वाचे कारण नकळे जग आश्‍चर्या करीतसे ॥

श्रीमन्नारायण असता त्राता । साधका नसे कसली चिंता ॥

हात सतत स्वच्छ धुवूया । बाहेर जातांना मास्क लावूया । शासन निर्देशांचे पालन करूया।
घरी राहूनी राष्ट्रकर्तव्य बजावूया । श्रीकृष्ण असता आपला भ्राता । साधका नसे कसली चिंता ॥

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा, गोवा  सध्याच्या काळात सामाजिक माध्यमांचे महत्त्व लक्षात घेता घरबसल्या समाजात राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करण्याच्या उद्देशाने नुकतेच धर्मप्रेमी महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले. या शिबिराचा अनेक धर्मप्रेमी महिलांनी लाभ घेतला.

काही स्वयंसेवी संस्थांचे (एन्.जी.ओ.) खरे स्वरूप !

मागील ५ वर्षांमध्ये पाकिस्तानला भारतात आतंकवाद पसरवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आता पाकिस्तान भारतामध्ये काही तरी निमित्ताने आंदोलने आणि हिंसाचार यांच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ही कामे भारतातील काही ‘एन्.जी.ओ.’चे (स्वयंसेवी संस्थांचे) कार्यकर्ते करत असतात.

समाजातील विवाह समारंभ आणि सनातन आश्रमातील विवाह सोहळा पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते.