गुरुदेव, एकच मागणे आपल्या चरणी ।

आषाढ कृष्ण पक्ष पंचमी (२८.७.२०२१) या दिवशी सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या ७७ वा वाढदिवसा निमित्ताने त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प.

कलियुगातील कलियुगी हिंदु राष्ट्र यावे, ही एकच आस ।

त्रेतायुगी राक्षस रावण वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र प्रकटले ।
द्वापरयुगी धर्मद्रोही कौरव माजता पांडवांसी रक्षण्या श्रीकृष्ण अवतरले ॥ १ ॥