रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील  कु. सिद्धी गावस हिला झालेले तीव्र आध्‍यात्मिक त्रास आणि त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी प्रयत्न केल्‍यावर तिच्‍यामध्‍ये झालेले पालट !

माझ्‍या स्‍वभावदोषांमुळे माझ्‍या सहसाधिकांना पुष्‍कळ त्रास व्‍हायचा, तरीही त्‍या मला कधीच काही बोलल्‍या नाहीत. त्‍या मला समजावून सांगत असत आणि मला सांभाळून घेत असत.

एखाद्याच्‍या प्रारब्‍धात दुःख असेल, तर त्‍यासाठी त्‍याला इतरांनी साहाय्‍य करणे आध्‍यात्मिकदृष्‍ट्या योग्‍य असणे

साधना करणार्‍या एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या प्रारब्‍धात दुःख असेल, तर त्‍यासाठी तिला इतरांनी साहाय्‍य करणे योग्‍य ठरते. हे व्‍यक्‍तीच्‍या पातळीवर अवलंबून नसून त्‍याने केलेले धर्माचरण आणि साधना या दोन्‍ही घटकांच्‍या संयोगावर अधिक अवलंबून आहे.

विविध त्रासदायक चेहरे उमटवण्‍याच्‍या माध्‍यमातून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्‍यावर मोठ्या वाईट शक्‍तींनी केलेली आक्रमणे !

एकदा एक फळ खाऊन झाल्‍यानंतर माझा उष्‍टा हात चुकून भिंतीला लागला. तेव्‍हा ‘काटेरी डोके असलेल्‍या मोठ्या वाईट शक्‍तीचा चेहरा भिंतीवर उमटला आहे’, असे थोड्या वेळाने माझ्‍या लक्षात आले. 

रामनाथी आश्रमात आल्‍यावर साकूर (यवतमाळ) येथील कु. वल्लभ पांडे (वय १५ वर्षे) याच्‍यात झालेले पालट

आश्रमात आल्‍यानंतर मला खोलीची स्‍वच्‍छता करण्‍याची सेवा मिळाली. त्‍या सेवेत मी पलंगावरील चादरीची घडी चुकीच्‍या पद्धतीने केली होती. तेव्‍हा तिथे सेवा करत असलेले श्री. हर्ष गोसावी यांनी ‘मला पलंगावरील चादरीची घडी कशी करायची ?’, हे शिकवले, तसेच ‘प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता कशी करायची ?’, हे मी कु. वल्लभ जोशी यांच्‍याकडून शिकलो.

रामनाथी आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय 

मी एका मंदिराचा विश्‍वस्‍त असल्‍याने ‘प्रत्‍येक मंदिरात असे आश्रम असावेत’, असे मला आवर्जून वाटते.’ 

साधकांनो, आश्रमातील अन्‍नपूर्णा कक्षातील (स्‍वयंपाकघरातील) सेवांमध्‍ये सहभागी होऊन स्‍वतःची आध्‍यात्मिक उन्‍नती करून घ्‍या !

अन्‍नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्‍याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्‍यात्मिक उन्‍नती केलेल्‍या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्‍यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्‍यात्मिक उन्‍नती करण्‍याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

‘आध्‍यात्मिक व्‍यक्‍तीमत्त्व विकास’ शिबिरासाठी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाण्‍याची आणि आश्रमातील दिनचर्या अनुभवण्‍याची संधी मिळाली. मी आश्रमातील सहजीवन अनुभवत असतांना माझे झालेले चिंतन लिहून देण्‍याचा प्रयत्न करत आहे.

‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

सगळे साधक सदैव तणावमुक्‍त आणि आनंदी दिसत होते. त्‍यांचा सतत ईश्‍वरी अनुसंधानात रहाण्‍याचा प्रयत्न असतो. साधकांचे ‘सतत ईश्‍वरी अनुसंधानात राहून वैयक्‍तिक आध्‍यात्‍मिक उन्‍नती करून घेणे’, हे ध्‍येय असल्‍यामुळे मायेतील मानवी भावना आणि आवश्‍यकता त्‍यांना मिथ्‍या वाटत असाव्‍यात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

आताच्‍या पिढीला आणि भरकटलेल्‍या समाजाला अशा आश्रमांची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.’ हे साध्‍य करण्‍यासाठी ‘भगवंताची कृपा आवश्‍यक आहे’, हे लक्षात आले.

‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

या वेळी ‘गोव्‍याला जायचे’, हे ठरल्‍यावर मला तेथील मंदिरे पहायची इच्‍छा झाली नाही. हा मला माझ्‍यात जाणवलेला मोठा पालट आहे.