बेंगळुरू (कर्नाटक) येथे पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन
बेंगळुरू (कर्नाटक) – देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्याचे स्वप्न भंग करण्यासाठी शेकडो क्रांतीकारकांनी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम यांचा इतिहास आजच्या युवा पिढीपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. आजच्या युवा पिढीमध्ये पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासारखे देशप्रेम स्वतःतही जागृत करायला हवे. अशा जागृत हिंदु युवकांमुळे भारताचे गतवैभव हिंदु राष्ट्र स्थापनेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. स्वाती एम्.के. यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है’ हे गीत रचणार्या पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या व्याख्यानाचा लाभ अनेक धर्मप्रेमींनी घेतला.
धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. पंडित राम प्रसाद बिस्मिल यांचे केवळ नावच ठाऊक होते; पण त्यांनी केलेला त्याग ऐकला नव्हता. आजच्या कार्यक्रमामुळे त्यांनी केलेल्या त्यागाविषयी ऐकतांना प्रतिक्षण शौर्य जागृत होत होते.
२. साम्यवाद्यांमुळे क्रांतीकारकांचा इतिहास आजपर्यंत शिकवला गेला नाही. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमामुळे क्रांतीकारकांविषयी समजले. त्यामुळे देश आणि धर्म यांची सेवा करण्यासाठी स्फूर्ती मिळाली.