श्रीमन्नारायण असता त्राता । साधका नसे कसली चिंता ॥

‘कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे काही साधकांना त्रास झाले अन् त्यांच्यात नकारात्मकता वाढली. त्या वेळी साधकांनी सकारात्मक होण्याच्या संदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेने मला खालील कविता स्फुरली. त्यासाठी श्री गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

श्री. संदीप वैती

विषाणूंचा जो आहे निर्माता (टीप १) ।
तोच आपला पाठीराखा असता ॥
साधका नसे कसली चिंता ॥ धृ. ॥

हात सतत स्वच्छ धुवूया ।
बाहेर जातांना मास्क लावूया ।
शासन निर्देशांचे पालन करूया ।
घरी राहूनी राष्ट्रकर्तव्य बजावूया ।
श्रीकृष्ण असता आपला भ्राता ।
साधका नसे कसली चिंता ॥ १ ॥

वर्तमानकाळात सदा राहूया ।
भगवंताची लीला अनुभवूया ।
स्वभावदोष आणि अहंचे निर्मूलन करूया ।
निर्धारित नामजप पूर्ण करूया ।
श्री दुर्गा-दत्त-शिव तारिती आता ।
साधका नसे कसली चिंता ॥ २ ॥

‘ऑनलाईन’ सत्संगाचा प्रसार करूया ।
अखिल समाजाला धर्माचरणी बनवूया ।
श्री गुरुदेवांची शिकवण आचरूया ।
गुरुकृपेची अनुभूती घेऊया ।
श्रीमन्नारायण असता त्राता ।
साधका नसे कसली चिंता ॥ ३ ॥

टीप १ – संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केलेल्या भगवंताने सर्वच जीवजंतूंची निर्मिती केली आहे.

– श्री. संदीप नरेंद्र वैती, शिवडी, मुंबई. (२.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक