(म्हणे), ‘मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘कोरडा दिवस’ पाळावा !’

मतदान आणि मतमोजणीचा दिवस सोडून इतर दिवशी बिनधास्त मद्य प्या, असे प्रशासनाला यातून सांगायचे आहे का ? राज्यात मद्य पिऊन लक्षावधी लोकांचा मृत्यू होत असतांना असे हास्यास्पद आवाहन करण्यापेक्षा कायमस्वरूपी मद्यबंदी लागू करण्याचा आग्रह का धरला जात नाही ?

मद्याच्या दुकानासाठी लाच घेणार्‍या राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी !

मद्याच्या दुकानासाठी लाच घेतल्याच्या तक्रारीवरून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चार जणांविरुद्ध संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे ‘या कथित लाचप्रकरणी कांबळे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका’, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केली आहे.

नवी मुंबईत बारच्या बाहेरील पदपथांवर बारचालकांचे अतिक्रमण !

लोक रस्त्यावर दारू प्यायला बसत असल्याने नागरिकांना पदपथावरून चालणेही कठीण होणार आहे, हे माहीत असूनही अशा प्रकारचे बारचालकांचे अतिक्रमण खपवून घेतले जात आहे.

होळी आणि रंगपंचमीनिमित्त बेळगाव येथे मद्यविक्रीवर निर्बंध

होळी आणि रंगपंचमी उत्सव शांततेत पार पडण्यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यात २० मार्चला दुपारी २ पासून २१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

नागपूर येथील जीटी आणि दक्षिण एक्सप्रेस रेल्वेतून मद्यसाठा जप्त !

रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) पोलिसांनी १७ मार्चला जीटी एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस रेल्वेतून मद्यसाठा जप्त करत एकाला अटक केली. देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आरपीएफ महासंचालकांनी रेल्वेतून होणार्‍या मद्यतस्करीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोलवाळ (गोवा) कारागृहात बंदीवानांना मिळतात अमली पदार्थ, मद्य, सिगारेट, स्मार्ट फोन आदी पंचतारांकित सुविधा !

कोलवाळ येथील कारागृहात बंदीवानांना (कैद्यांना) अमली पदार्थ, मद्य, सिगारेट, स्मार्ट फोन आदी पंचतारांकित सुविधा मिळत असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘प्रूडंट मीडिया’ या वृत्तवाहिनीने हे विशेष वृत्त प्रसारित केले आहे.

गोव्यात ‘सनबर्न’ला अनुज्ञप्ती देणार्‍या भाजपप्रणीत शासनाच्या विरोधात राजकीय पक्ष आणि नागरिक यांच्या प्रतिक्रिया !

पर्यटन वृद्धींगत करण्याच्या नावाखाली गोव्यातील भाजपप्रणीत शासनाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा रोष पत्करून वागातोर येथे २३ आणि २४ फेब्रुवारी या दिवशी ‘सनबर्न क्लासिक’ महोत्सवाला अनुज्ञप्ती दिली.

सर्वाधिक मद्यप्राशन करणार्‍या राज्यांमध्ये गोव्याचा क्रमांक पहिल्या पाच राज्यांत

सर्वाधिक मद्यप्राशन करणार्‍या राज्यांमध्ये गोव्याचा क्रमांक पहिल्या पाच राज्यांत आहे. गोव्यासह छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक मद्यप्राशन केले जाते.

मोदी साहेबांना महिलांचे मत पाहिजे असल्यास यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करावी !

पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारीला होणार्‍या महिला बचत गटाच्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी येणार आहेत. महिलांना खर्‍या अर्थाने आर्थिक, सामाजिक आणि मानसिकरित्या सक्षम करायचे असल्यास त्यांनी सर्वांत प्रथम दारूबंदी करायला हवी. अन्यथा कितीही प्रयत्न केले, तरी महिला सक्षम होणार नाहीत.

१ एप्रिलपासून ‘मद्यपान करून वाहन चालवू नका !’ हे फलक मद्यालयांमध्ये प्रदर्शित करणे बंधनकारक ! – गोवा शासन

१ एप्रिलपासून ‘मद्यपान करून वाहन चालवू नका !’ हे फलक मद्यालयांमध्ये प्रदर्शित करणे मद्यालये आणि हॉटेल यांच्या मालकांना बंधनकारक असणार आहे. गोव्यातील ‘रस्ता सुरक्षा मंडळा’च्या १२ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या बैठकीत …..


Multi Language |Offline reading | PDF