कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याचे प्रकरण वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्‍य प्रशासकीय अधिकारी कह्यात !

धन्‍वन्‍तरी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या हस्‍तांतरणाच्‍या संदर्भात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी धन्‍वन्‍तरी महाविद्यालय आणि संशोधन विभाग यांचे मुख्‍य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख यांना पुणे पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेने कह्यात घेतले आहे

‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक !

‘जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड’ आस्थापनाचे संस्थापक नरेश गोयल (वय ७४ वर्षे) यांनी कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केली. याच्याशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ (काळा पैसा पांढरा करणे) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्यांना अटक केली. 

आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरेंसह १४ नावांचा समावेश !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ सहस्र कोटी रुपयांच्या अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पुरवणी आरोपपत्रात १४ जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

अदानी यांच्या माध्यमातून १ बिलीयन डॉलर विदेशात पाठवण्यात आले ! – राहुल गांधी, काँग्रेस

अदानी देशातील विविध मालमत्तांची खरेदी करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली.

देहली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या साहाय्यक संचालकास अटक

अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !

थकीत कर्जप्रकरणी जळगाव येथील आर्.एल्. समूहाची ईडीकडून तपासणी !

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी येथील आर्.एल्. समूहाची ईडीकडून तपासणी करण्यता आली.

जळगाव येथील राजमल लखीचंद ज्‍वेलर्सच्‍या दुकानांवर ‘ईडी’च्‍या धाडी !

राजमल लखीचंद समूहाच्‍या विविध आस्‍थापनांवर ‘ईडी’कडून एकाचवेळी ६ ठिकाणी धाडी घालण्‍यात आल्‍या. त्‍यात ६० अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. या घटनेत माजी आमदार मनीष जैन यांचीही चौकशी केल्‍याचे समोर येत आहे

राजकीय निर्णय आणि कोण कुठल्‍या पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या फुटीनंतर त्‍या मागे काही नेत्‍यांवर असलेल्‍या ‘ईडी’च्‍या कारवाईची टांगती तलवार असल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या मोठ्या नेत्‍यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्‍याचा निर्णय घेतल्‍याची चर्चा होती.

नवाब मलिक यांना २ मासांसाठी जामीन !

वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना जामीन देण्‍यात आल्‍यामुळे ‘ईडी’कडूनही विरोध करण्‍यात आलेला नाही. नवाब मलिक यांना मूत्रपिंडाचा आजार आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्‍त दिलीप ढोले यांना आर्थिक अपहाराच्‍या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्‍स देण्‍यात आला आहे. ठाणे येथील बांधकाम व्‍यावसायिकाशी एका कथित आर्थिक घोटाळ्‍याच्‍या प्रकरणात जबाब नोंदवण्‍यासाठी हा समन्‍स पाठवण्‍यात आला आहे.