(म्हणे) ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य, थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा, शेतकर्‍यांना शेतीसाठी विनामूल्य वीज !’

जनतेला लाचार बनवून स्वतःचा स्वार्थ साधणारे राजकीय नेते देशद्रोहीच होत !

केजरीवाल देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत देशाचे मत नाही ! – भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सिंगापूरकडे स्पष्टीकरण

अरविंद केजरीवाल हे देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत हे देशाचे मत नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सिंगापूरला स्पष्ट केले.

केजरीवाल आणि ऑक्सिजन !

केजरीवाल यांनी केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा न करण्याविषयी जे आरोप केले आहेत, त्याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रतिवाद करून ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याची माहिती दिली आहे.

ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या हातात द्या ! : देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधान मोदी यांना सूचना

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ,  आणि तमिळनाडू राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

देहलीमध्ये २६ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित

देहली राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दळणवळण बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

केजरीवाल शासन देहली येथे कोकणी अकादमी स्थापन करणार

भारतातील विद्यार्थ्यांना भाषेसंबंधी ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील केजरीवाल शासनाने देहलीमध्ये कोकणी अकादमी चालू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. देहली मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत फाडली कृषी कायद्याची प्रत !

मुख्यमंत्रीपदावर असतांना भर विधानसभेत अशोभनीय आणि लोकशाहीविरोधी कृत्य करणारे केजरीवाल ! लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे वर्तन सुशिक्षित आणि सभ्य व्यक्ती कधीही करणार नाही, हे केजरीवाल यांना ठाऊक नाही का ?

सत्ताधारी भाजपचे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत

सत्ताधारी भाजपने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे १९, काँग्रेसचा १, तर अपक्ष ५ उमेदवार विजयी झाले, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे १४, काँग्रेसचे ३, मगोपचे ३, ‘आप’चा १, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि अपक्ष २ उमेदवार विजयी झाले आहेत.

देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.