पुणे शहरातील ‘कोयता गँग’मागील ‘सूत्रधारां’वर कडक कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात.