Deity Names Bars N WineShops : मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार आणि मद्यालये यांना देवतांची नावे !

बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ?

वझरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ग्रामस्थांनी गावातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले !

अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

AAP Party Goa : गोव्यातील ‘आप’चे गोवा संयोजक अमित पालेकर यांच्यासह चौघांना ‘ईडी’चे समन्स

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ‘आप’चे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक यांना समन्स पाठवले आहे.

मद्यालये-बार यांना देवतांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय केवळ कागदावर !

राज्यात ‘लक्ष्मी बीअरबार’, ‘साई बीअरबार’ या नावाने मद्यालये कार्यरत आहेत. केवळ आदेशात स्पष्टता नसल्यामुळे मद्यालयांना असलेल्या देवतांच्या नावामध्ये अद्यापही पालट करण्यात आलेले नाहीत.

गोवा : प्रथम वैध कागदपत्रे सादर करा आणि नंतर टाळे ठोकण्याच्या विरोधात आदेश मागण्यासाठी या ! 

अनधिकृत बांधकाम करणार्‍या काही ‘शॅक’चालकांनी या आदेशातून सवलत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यास अनुसरून गोवा खंडपीठाने सवलत मागणार्‍या याचिकादारांना सुनावले आहे.

Goa Illegal Constructions : हणजूण (गोवा) येथील अनधिकृत बांधकामांवर धिम्या गतीने कारवाई !

या प्रकरणी उच्च न्यायालयाने हणजूण पंचायतीच्या सचिवांना कारवाईसंबंधी माहितीचे प्रतिज्ञापत्र ६ मार्च या दिवशी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

कर चुकवेगिरी, बेहिशोबी पैसे, हवाला रॅकेट या संदर्भात गेली अनेक वर्षे काही कृती न करणार्‍या पोलिसांवरही कारवाई करा !

‘आयकर खात्याने २ जानेवारी २०२४ पासून गोवा राज्यातील सुमारे ४० प्रसिद्ध ‘नाईट क्लब’, ‘पब’, उपाहारगृहे आणि हॉटेल्स यांवर धाडी घातल्या आहेत.

समर्थनगर, नरडवे रोड येथील ‘बियर बार’ची अनुमती रहित करण्याची नागरिकांची मागणी

स्थानिक रहिवाशांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता समर्थनगर, नरडवे रोड येथे ‘बियरबार आणि परमिट रूम’ला (मद्यालयाला) अनुमती मिळाल्याचे समजते.

नाशिक येथे महिला पोलिसांकडून अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त !

नाशिक महिला पोलिसांनी गावागावांतील अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, तर एकूण ३३ आरोपींविरुद्ध मुंबई मद्यबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ९४ सहस्र १७० रुपयांचे गावठी हातभट्टीचे मद्य, रसायन आणि इतर साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत महत्त्वाच्या दिवशी मद्य आणि माडी विक्री बंद रहाणार !

गणेशोत्वसाच्या कालावधीत तीन महत्त्वाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, तसेच विदेशी मद्य आणि माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद रहातील-जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह