आसगाव (गोवा) येथे ‘नाईट क्लब’च्या विरोधात आसगाव-बादे नागरिक कृती समितीने आंदोलन छेडल्याचे प्रकरण
म्हापसा, ३० एप्रिल (वार्ता.) : आसगाव येथे सर्व्हे क्रमांक २२४/२ मध्ये लोकवस्तीच्या ठिकाणी येऊ घातलेल्या भव्य अशा ‘नाईट क्लब’च्या विरोधात आसगाव-बादे नागरिक कृती समितीने आंदोलन छेडले आहे. आसगाव येथील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला श्री दत्तात्रेय देवस्थान समिती, ‘औदुंबर टेंपल प्रॉपर्टी ट्रस्ट’ आणि श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान यांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे.
१. आसगाव येथील श्री दत्तात्रेय देवस्थानने ‘नाईट क्लब’च्या विरोधात आंदोलन छेडणार्या आसगाव-बादे नागरिक कृती समितीला एक पत्र लिहून ‘नाईट क्लब’ला देवस्थान समितीचा विरोध असल्याचे म्हटले आहे. समितीने या पत्रात म्हटले आहे की, आसगाव हे एक निसर्गरम्य गाव आहे. या ठिकाणी अनेक मंदिरे आणि चर्च आहेत. गावात अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. गावातील लोक धार्मिक आहेत. ‘नाईट क्लब’ ही आमची संस्कृती नाही आणि तिला आम्ही गावात स्थान देणार नाही. ‘नाईट क्लब’ला समितीचा तीव्र विरोध आहे. गावात ‘नाईट क्लब’ झाल्यास गावातील युवकांचे भवितव्य नष्ट होईल.
२. आसगाव येथील ‘औदुंबर टेंपल प्रापर्टी ट्रस्ट’ने आसगाव पंचायतीच्या सरपंचांना पत्र लिहून गावातील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला विरोध असल्याचे म्हटले आहे. ‘गावात ‘नाईट क्लब’ झाल्यास येथे कळंगुटप्रमाणे स्थिती निर्माण होईल. ‘नाईट क्लब’ला गावात स्थान देऊ नये’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
३. आसगाव येथील श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान समितीने आसगाव-बादे नागरिक कृती समितीला एक पत्र लिहून ‘नाईट क्लब’ला समितीचा विरोध असल्याचे म्हटले आहे.
Goa Temples Oppose NightClub Culture : ‘नाईट क्लब’ला विविध देवस्थान समित्यांचाही विरोध !
वाचा :https://t.co/0MoImD4eZy
आसगाव येथील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला श्री दत्तात्रेय देवस्थान समिती, ‘औदुंबर टेंपल प्रॉपर्टी ट्रस्ट’ आणि श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान यांनीही तीव्र विरोध… pic.twitter.com/xkaZxaCqjt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 1, 2024
संपादकीय भूमिकाअनैतिक प्रकारांना विरोध करणार्या देवस्थान समित्यांचे अभिनंदन ! |