मालवणी (मुंबई) येथे विषारी मद्यामुळे १०६ जणांच्या मृत्यूप्रकरणी ४ जण दोषी !

मुंबई सत्र न्यायालय

मुंबई – वर्ष २०१५ मध्ये मालवणीमधील लक्ष्मीनगर येथे मद्य पिऊन १०६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जणांना अपंगत्व आले होते. हे मद्य विषारी असल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले होते. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने ४ जणांना दोषी ठरवले आहे. २९ एप्रिल या दिवशी ही सुनावणी झाली असून शिक्षेचे स्वरूप न्यायालय ६ मे या दिवशी घोषित करणार आहे.