स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत पाकने काढलेल्या भारताच्या कुरापती आणि भारतीय सैन्यदलांचे अतुलनीय शौर्य

ब्रिटिशांनी केलेल्या फाळणीचे फलित म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातील कायमचे वितुष्ट. यामुळे उभय देशात आतापर्यंत चार मोठी युद्धे झाली.

नवी मुंबई शहरनिर्मितीसाठी विस्तारित गावठाणांच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध

४० वर्षांपासून रखडलेल्या विस्तारित गावठाणांच्या सर्वेक्षणात शासन मनमानीपणा करत असल्याचा आरोप करत या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे….

जगात प्रतिवर्षी पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे ९० लाख लोकांचा अकाली मृत्यू

विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीचाच हा दुष्परिणाम आहे. विज्ञानाच्या कथित प्रगतीपूर्वी पृथ्वीवर प्रदूषण नावाची गोष्ट अस्तित्वातच नव्हती, हे तथाकथित विज्ञानवादी कधी मान्य करतील का ?

लोकसभा निवडणुकीवर ५० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता

ज्या देशातील प्रत्येक नागरिकावर ६२ सहस्र रुपयांचे कर्ज आहे, त्या देशातील निवडणुकीवर असा खर्च केला जात असेल आणि त्यातून निवडून येणार्‍यांमध्ये अनेक जण हत्या, बलात्कार, फसवणूक, खंडणी आदी गुन्हे करणारे असणार आहेत, तर याला लोकशाही म्हणता येईल का ?

पैसे देऊन मत खरेदी करण्याला लोकशाही म्हणायचे का ?

नवी देहली येथील ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या अहवालानुसार भारतातील आताची निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वांत महागडी निवडणूक प्रक्रिया ठरणार आहे. त्यावर ५० सहस्र कोटी रुपये इतका खर्च होण्याची शक्यता आहे.

वर्ष २०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या कालावधीत दक्षिण आणि उत्तर मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ ! – प्रजा फाऊंडेशन

वर्ष २०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या कालावधीत दक्षिण आणि उत्तर मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने दक्षिण अन् उत्तर मुंबई महिलांसाठी धोकादायक आहे, अशी माहिती प्रजा फाऊंडेशन या संस्थेने अहवालात दिली आहे.

मोठ्या आवाजात ढोल वाजवणार्‍या युवतींचे मातृत्व भविष्यात धोक्यात !

परंपरेने स्त्री-पुरुषांमध्ये कामांची विभागणी ही त्यांच्या नैसर्गिक शरीररचनेच्या दृष्टीने केलेली असते, हे शास्त्र लक्षात न घेता स्त्री-पुरुष समानतेच्या खोट्या अभिनिवेशापोटी सध्या युवतींनी मोठे ढोल वाजवण्याची टूम (फॅशन) निघाली आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाल्यावरच डोळे उघडणार का ?

जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमधील १५ शहरे भारतात !

जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये १५ शहरे भारतातील आहेत. यामध्ये देहलीजवळील ‘राष्ट्रीय राजनाधी क्षेत्र (एनसीआर)’ हे वर्ष २०१८ मधील जगातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून नव्याने समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी शाळा मृतप्राय होण्याच्या मार्गावर !

गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, इंदूर, देहली येथे मराठी शाळा आणि ग्रंथालय यांची स्थिती आता मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now