Global Muslim Population Rise : वर्ष २०६० पर्यंत मुसलमान जगातील सर्वांत मोठा धार्मिक गट बनेल !

  • अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’चा दावा

  • तरुणांची मोठी लोकसंख्या, उच्च प्रजनन दर आणि धर्मांतर या प्रमुख कारणांमुळे मुसलमानांचे वर्चस्व वाढणार !

न्यूयॉर्क (अमेरिका) – जगभरात मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. न्यूयॉर्क येथील ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अलीकडील अभ्यासानुसार इस्लाम हा सध्या जगातील सर्वांत वेगाने वाढणारा पंथ आहे. वर्ष २०६० पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या तब्बल ७० टक्क्यांनी वाढेल आणि ती ३०० कोटींचा आकडा ओलांडेल. त्यामुळे वर्ष २०६० पर्यंत मुसलमान जगातील सर्वांत मोठा धार्मिक गट बनेल. या अभ्यासानुसार तरुणांची मोठी लोकसंख्या, उच्च प्रजनन दर आणि धर्मांतर या प्रमुख कारणांमुळे मुसलमानांचे वर्चस्व वाढेल. सध्या पृथ्वीवर सर्वाधिक लोकसंख्या ही ख्रिस्त्यांची आहे.

वर्ष २०५० मध्ये भारतात ७७ टक्के हिंदु लोकसंख्या असणार !

भारत आणि नेपाळ भविष्यात हिंदु बहुसंख्य राष्ट्रेच रहातील. वर्ष २०१० मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के हिंदू होते आणि वर्ष २०५० पर्यंतही ते बहुसंख्यच रहातील. भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचा वाटा ७७ टक्के असेल. वर्ष २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के असेल, तर हिंदूंची लोकसंख्या ही १५ टक्के असेल. या अभ्यासानुसार पुढील २५ वर्षांत जगभरातील हिंदूंची लोकसंख्या १०० कोटींवरून १४० कोटी होईल. (वर्ष २०११ मध्ये भारतात हिंदु लोकसंख्येची टक्केवारी ८० टक्क्यांहून थोडी अधिक होती. त्यानंतर ४० वर्षांत ती ३ टक्क्यांनी अल्प होईल. याचा अर्थ प्रत्येक दशकाला हिंदु लोकसंख्येची टक्केवारी ही साधारण एका टक्क्याने खालावत आहे. पुढे याची गती आणखी वाढली, तर ५०० वर्षांत हिंदू हे भारतात औषधालाही रहाणार नाहीत. हे होऊ द्यायचे नसेल, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – संपादक)

कॅनडामध्ये मुसलमान लोकसंख्या वाढणार !

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अभ्यासानुसार कॅनडामधील मुसलमानांची लोकसंख्या वर्ष २०३० पर्यंतच तिप्पट होईल. वर्ष २०१० मध्ये ती ९ लाख होती, तर २०३० मध्ये ती २७ लाख होण्याची शक्यता आहे. यामुळे कॅनडाच्या एकूण लोकसंख्येत मुसलमानांचा वाटा ६.६ टक्के होईल.

त्याचप्रमाणे अमेरिकेतही मुसलमानांची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे, ज्यामध्ये ०-४ वर्षे वयोगटातील मुसलमान मुलांची लोकसंख्या वर्ष २०१० च्या तुलनेत २ लाखांवरून ६ लाख ५० सहस्रांपर्यंत वाढेल.

संपादकीय भूमिका

‘प्यू रिसर्च’च्या या दाव्याला खरे मानले, तर भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, हेच खरे !