पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या ३ शैक्षणिक वर्षांमध्ये प्राथमिक शाळेत गळतीचे प्रमाण ० वरून ०.८१ टक्क्यावर पोचले आहे.
अहवालानुसार वर्ष २०१९-२० मध्ये पहिली ते चौथीपर्यंत गळतीचे प्रमाण ०.२७ टक्के, वर्ष २०२०-२१ मध्ये ०.६८ टक्के, वर्ष २०२१-२२ मध्ये शून्य, वर्ष २०२२-२३ मध्ये ०.३१ आणि २०२३-२४ मध्ये ०.८१ टक्के होते. यामध्ये मुलांपेक्षा मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंत (उच्च माध्यमिक) गळतीचे प्रमाण १.०९ टक्के आणि याच वर्षी इयत्ता ९ वी ते १० वी विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण ८.०७ टक्के आहे.