Up Samabhal Survey : संभल (उत्तरप्रदेश) येथे या ३० ठिकाणांचे झाले सर्वेक्षण !

संभल (उत्तरप्रदेश) – गेल्या काही काळापासून उत्तरप्रदेशाच्या संभलमध्ये उत्खनन आणि स्वच्छता यांचे काम चालू आहे. या काळात ६ हून अधिक मंदिर आणि २४ विहिरी सापडल्या. या ३० ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये चतुर्मुख ब्रह्म कूप (विहीर), अमृत कूप, अशोक कूप, सप्तसागर कूप, बलि कूप, धर्म कूप, ऋषिकेश कूप, पराशर कूप, अकर्ममोचन कूप, धरणि बाराह कूप, भद्रका आश्रम तीर्थ, स्वर्गदीप तीर्थ, चक्रपाणि तीर्थ यांच्यासह कल्कि श्रीविष्णु मंदिर, बावडी चंदौसी, फिरोजपूरचा किल्ला, झेम नाथ मंदिर, तोता मैनाचे थडगे आणि पृथ्वीराजची बावडी उपाख्य चोरांची विहीर यांचा समावेश आहे.