मेट्रोसाठी ‘आरे’ वसाहतीतील वृक्षतोडप्रकरणी पर्यावरणप्रेमींची निदर्शने !

‘आरे’ वसाहतीतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी या परिसरातील वृक्ष तोडण्यात आले होते. त्याविरोधात ३१ जुलै या दिवशी पर्यावरणप्रेमींनी आरे वसाहतीमध्ये निदर्शने केली. या आंदोलनात स्थानिक आदिवासीही सहभागी झाले होते.

राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने !

ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.

भारताच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’वरील बंदीचे जगभरातून स्वागत !

भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले की, मला वाटते ही फार मोठी कल्पना आहे. भारताने या प्लास्टिकवर घातलेली बंदी ही पृथ्वीला मिळालेली मोठी देणगी आहे. भारत या दिशेने मोठे योगदान देत आहे; म्हणूनच मी भारताचे अभिनंदन करतो.

 ‘माऊंट एव्हरेस्ट’वर सापडला तब्बल ३४ टन कचरा !

यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !

नवी मुंबई येथे रस्त्याच्या कामासाठी २ सहस्र ५०० झाडे तोडण्याचा डाव !

पर्यावरणमंत्र्यांनी यात लक्ष घालून होणारी वृक्षतोड थांबवावी, ही अपेक्षा !

मौसमी पावसाचे केरळमध्ये आगमन

यासमवेतच लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडूतील काही भाग आदी ठिकाणीही मौसमी पावसाला आरंभ झाला आहे. आंध्रप्रदेशातील रायलसीमा क्षेत्रात ३ जूनपर्यंत मान्सून पोचेल. गोवा राज्यात मान्सून पोचायला आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, तर ३० मेपासून महाराष्ट्रात मान्सूनआधीचा पाऊस पडायला आरंभ झाला आहे.

चारधाम यात्रा मार्गावरील कचर्‍यामुळे पर्यावरणाला धोका ! – तज्ञांची चिंता

चारधाम यात्रेच्या मार्गात सध्या सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांसह कचर्‍याचे ढीग दिसत आहेत, जे पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. यावर पर्यावरण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

जगभरात वर्ष २०२१ मध्ये २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट !

जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले सूत्र

१०० वर्षांपर्यंत जीवित रहाण्याच्या इच्छेसहित कर्म करा; परंतु परमात्म्याने निर्माण केलेले सृष्टीचक्र चालवण्यासाठी आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याच्या रूपात करा. लालसेच्या (गिद्ध) दृष्टीने करू नका. असा निरापद, स्वास्थ्य संवर्धक पर्यावरण आणि विश्वात शांतीचा संदेश देणारे ‘वेद’ भगवंतच आहेत.’

११ सहस्र वृक्ष वाचवण्यासाठी बैठक घेऊ ! – नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

११ सहस्र वृक्ष असलेली गोवर्धन शिवारातील २५ एकर भूमी सिपेट प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयाविषयी आपण बैठक घेऊ आणि चौकशी करू, तसेच पर्यायी भूमी असेल, तर यातून मार्ग काढता येईल, असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिले.