हिंदूंविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या धर्मांध मुसलमानाला फाेंडा (गोवा) येथील संतप्त हिंदूंनी दिला चोप !

प्रतिकात्मक छायाचित्र

फोंडा, २५ एप्रिल (वार्ता.) – ‘हिंदूंना बांगलादेशाने जसे कापले, तसे कापले पाहिजे’, असे म्हणणार्‍या एका धर्मांध मुसलमानाला फोंडा येथे संतप्त हिंदु जमावाने चोप दिला. ही घटना २४ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजता फोंडा शहरात घडली.

फोंडा शहरात एके ठिकाणी एक धर्मांध मुसलमान ग्राहक दुकानातून सामान घेत होता. या वेळी त्याने ‘हिंदूंना बांगलादेशप्रमाणे कापले पाहिजे. आमचे दिवस लवकरच येणार आहेत’, अशा स्वरूपाचे विधान केले. त्या वेळी दुकानामध्ये अन्य हिंदु ग्राहकही होते. धर्मांधाचे हे विधान ऐकून हिंदू संतापले आणि त्यांनी धर्मांधाला यथेच्छ चोप देण्यास प्रारंभ केला. यानंतर तेथे मोठ्या संख्येने हिंदू एकत्र आले आणि सर्वांनी संबंधित धर्मांधाला चोप दिला.

प्राप्त माहितीनुसार संबंधित धर्मांध मुसलमान दुकानात आल्यावर नेहमीच ‘हिंदूंना कापले पाहिजे’, असे बोलत असे; मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. (धर्मांध मुसलमानाच्या या विधानाकडे दुर्लक्ष केल्यानेच तो शेफारला. हिंदूंनी वेळी त्याची पोलीस ठाण्यात तक्रार करायला हवी होती ! – संपादक) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर सर्वत्र संतप्त वातावरण आहे. अशा परिस्थितीत धर्मांधाने वादग्रस्त विधान केल्याने ही घटना घडली. या प्रकरणी फोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही.

संपादकीय भूमिका

गोव्यासारख्या शांत प्रदेशातील मुसलमानांची धर्मांधता वाढत आहे का ? याचे अन्वेषण सरकारने करून संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे, तरच पहलगामसारख्या घटना थांबतील !