पहलगाम आतंकवादी आक्रमणाचे सूत्र ब्रिटीश संसदेत उपस्थित !

लंडन (ब्रिटन) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे सूत्र ब्रिटनच्या संसदेत शीख खासदार तनमनजीत सिंह धेसी आणि ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी उपस्थित केला. त्यांना या आक्रमणाला ‘भ्याड, भयानक आणि धक्कादायक आतंकवादी आक्रमण’ संबोधले. त्यांनी संसदेत उपस्थित असलेल्या सभागृह नेत्यांना विनंती केली की, त्यांनी या प्रसंगी भारतीय जनतेप्रती ब्रिटीश संसदेच्या वतीने शोक व्यक्त करावा आणि या अमानवी आक्रमणाचा तीव्र निषेध करावा.
आतंकवादी आक्रमणाचे चुकीचे वार्तांकन करणार्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’वर अमेरिकेची टीका
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे वृत्तांकन करतांना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने याला ‘सशस्त्र आक्रमण’ म्हटले होते, ज्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने अप्रसन्नता व्यक्त केली. समितीने म्हटले की, हे सरळ सरळ आतंकवादी आक्रमण होते, न्यूयॉर्क टाइम्स सत्यापासून फार दूर आहे.’ (‘न्यूयॉर्क टाइम्स’ हे वृत्तपत्र भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी असल्याने ते असेच वार्तांकन करणार, हे स्पष्ट आहे. त्यातही अमेरिकेने आता त्याचे कान उपटले यातून अमेरिकेच्या सरकारमध्ये पालट झाला आहे, ही चांगली गोष्ट आहे ! – संपादक)