Americans Convert To Islam : अमेरिकेमध्ये २० टक्के लोकांनी स्वीकारला इस्लाम !

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणात दावा

नवी देहली – अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने ३६ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २० टक्के आणि केनियातील ११ टक्के लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशांतील लोक हे अगोदर ख्रिस्ती होते. यामध्ये उतारवयातील लोकांची संख्या अधिक आहे. या दोन्ही देशांत सध्या मुसलमान अल्पसंख्यांक आहेत. या ३६ देशांमध्ये भारताचा समावेश आहे कि नाही ?, हे समजू शकलेले नाही.

१. या सर्वेक्षणात एकूण ३६ देशांपैकी १३ देशांमध्येच योग्य नमुने गोळा करता आले. यामध्ये इस्लाम स्वीकारणारे आणि इस्लाम सोडणारे, अशा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली. या देशात आर्थिक प्रगत राष्ट्रांसह आफ्रिकी आणि इतर खंडांतील देशांचा समावेश होता.

२. ज्या १३ देशांमध्ये या संस्थेला नमुने गोळा करता आले त्याठिकाणी इस्लाम सोडणार्‍यांचा अभ्यास करण्यात आला. हे लोक इस्लाम सोडल्यावर इतर कोणताच धर्म स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. ते नास्तिक झाले आहे अथवा त्यांना कोणताच धर्म स्वीकारायचा नसल्याचे त्यांनी सांगितले. काही जणांनी इस्लाम सोडल्यावर ख्रिस्ती धर्माला जवळ केल्याचे समोर आले आहे.