गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचे हिंदु नववर्ष साजरे करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात वितरण करावे.

सातारा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू कार्यक्रम

नागेवाडी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. योजना जाधव यांनी उपस्थित जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन केले.

आंध्रप्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या काळात प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ

येथील प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळात भाविकांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये; म्हणून ठिकठिकाणी जाण्यासाठी अधिक बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्यासाठी प्रवासीभाड्यामध्ये ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक :  ११ डिसेंबर २०१९
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० डिसेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !

‘सनातन संस्थे’च्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व आदी दिले आहे.

सोलापूर येथे दत्तजयंतीनिमित्त लावलेल्या ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री कक्षाला समाजाकडून मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद !

‘दत्तमंदिराजवळ जेथे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री कक्ष लावायचे नियोजन होते, तेथेच पुष्कळ वाहने उभी केलेली होती. आम्ही साधिका ती वाहने बाजूला एका ओळीत लावत होतो.