Global Safety Index 2025 : जगातील सर्वांत सुरक्षित देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित

अमेरिका आणि ब्रिटन मात्र भारताच्या मागे !

लंडन (ब्रिटन) – जगातील सर्वांत सुरक्षित देशांची सूची घोषित करण्यात आली आहे. यांत अँडोरा हा युरोपमधील देश जगातील सर्वांत सुरक्षित देश ठरला आहे. सुरक्षित देशांची क्रमवारी त्या देशातील राहणीमान आणि गुन्हेगारीचे प्रमाण यांच्या आधारे सिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पाकिस्तानचा क्रमांक ६५ आहे, तर भारताचा ६६ वा क्रमांक आहे. म्हणजे भारतापेक्षा पाकिस्तान काकणभर अधिक सुरक्षित आहे, असे म्हटले आहे. त्या वेळी जगातील सर्वांत सुरक्षित देशांमध्ये अमेरिका ८९ व्या क्रमांकावर आहे, तर ब्रिटन क्रमवारीत ८७ व्या स्थानावर आहे. या दोघांच्या तुलनेत मात्र भारत पुढे आहे. भारताचा आणखी एक शेजारी देश चीन या सूचीत १५ व्या स्थानावर आहे. सूचीत समाविष्ट असलेल्या एकूण १४७ देशांमध्ये अमेरिकेजवळी व्हेनेझुए देश सर्वांत तळाशी आहे.

संपादकीय भूमिका

‘या सूचीवर किती विश्वास ठेवायला हवा ?’, हा प्रश्नच आहे. पाश्चात्त्य देशांतील संस्थांकडून बनवण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या सूची बनावट असून वस्तूस्थितीला धरून नसतात, हे सहजपणे लक्षात येते !