Srilankan Intruders : ६ महिन्यांत ३ सहस्र श्रीलंकन नागरिकांची भारतात घुसखोरी !

  • अनेक जण कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत स्थायिक !

  • श्रीलंकेतील इम्रान हजियार आणि भारतातील महंमद इब्राहिम यांच्या नेतृत्वाखाली तस्करी !

नवी देहली – श्रीलंकेतून भारतात घुसखोरी चालू असल्याचे नवीन पुरावे गुप्तचर संस्थांच्या हाती लागले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी मानवी तस्करीच्या टोळीचे काही दूरभाष मुद्रित करून काही जणांना अटक केली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि तामिळनाडू आतंकवाद विरोधी पथक यांच्या संयुक्त अन्वेषणात गेल्या ६ महिन्यांत ३ सहस्रांहून अधिक श्रीलंकन नागरिकांनी भारतात घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. यांपैकी अनेक जण कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये स्थायिक झाल्याचेही समोर आले, तर काहींनी कॅनडा गाठले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानवी तस्करीचे हे षड्यंत्र श्रीलंकेतील इम्रान हजियार आणि भारतातील महंमद इब्राहिम हे चालवत होते. इब्राहिम याला २८ फेब्रुवारीला अटक करण्यात आल्यावर त्याच्या चौकशीच्या वेळी तस्करीचे हे जाळे उघड झाले.

‘डंकी मार्गा’चा वापर करून अनेकांना पाठवण्यात आले कॅनडात !

१. श्रीलंकेहून या लोकांना मसेमारांच्या नौकांमधून तामिळनाडूतील थुथुकुडी येथील मंडपम् येथे आणले जाते. तेथील ‘तस्कर होल्डिंग एरिया’ या नावाने असलेल्या एका गोदामात त्यांना ठेवले जाते.

२. २० जणांचा गट करून त्यांना लहान नौका आणि ट्रक यांमधून तमिळनाडू अथवा कर्नाटक राज्यातील काही भागात पाठवले जाते. यांपैकी बहुतेक जण बेंगळुरू अथवा मंगळुरू येथे स्थायिक झाले आहेत.

३. भारतात घुसखोरीसाठी २० लाख रुपयांपर्यंत, तर कॅनडामध्ये प्रवेश करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते.

४. ज्यांना कॅनडाला जायचे असते, त्यांना भारताचे बनावट आधारकार्ड बनवून दिले जाते. कॅनेडियन व्हिसा मिळवण्यासाठी श्रीलंका पसंतीच्या देशांच्या सूचीत नाही. अशा परिस्थितीत श्रीलंकेचे लोक तिथे जाण्यासाठी स्वतःला भारतीय म्हणून घोषित करतात. यासाठी भारताचा ‘डंकी मार्ग’ वापरला जातो. श्रीलंकेचे लोक कॅनडामध्ये ‘अभ्यास व्हिसा’ किंवा ‘बनावट वर्क परमिट’ मिळवतात.

भारतातील  मृत झालेल्या व्यक्तींच्या नावे सिद्ध केले जाते आधार कार्ड !

तामिळनाडू आतंकवादविरोधी पथकाने काही श्रीलंकन नागरिकांना पकडले, तेव्हा त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित सर्व कागदपत्रे असल्याचे आढळून आले. मानवी तस्करांनी यांपैकी अनेकांना मृत झालेल्या व्यक्तींच्या नावे आधारकार्ड दिले होते. मृतांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले आणि त्यांची छायाचित्रे पालटण्यात आली. काही प्रकरणांमध्ये आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र ही बनावट कागदपत्रांच्या आधारे सिद्ध केल्याचेही समोर आले आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होऊन बनावट आधारकार्ड दिले जाणे, हे प्रशासनाच्या साहाय्याविना अशक्य आहे. त्यामुळे यामध्ये गुंतलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात धाडले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !