
पुणे – महापारेषणच्या जेजुरी ४४० केव्ही ‘टॉवर लाईन’मध्ये रात्री बिघाड झाला. त्यामुळे पारेषण वीजवाहिनीमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके आणि बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भार व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात झाली. परिणामी महापारेषणच्या अतीउच्च दाबाचा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे ४ लाख ५७ सहस्र ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत् करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित