Jaishankar On Unrest B’desh : (म्हणे) ‘बांगलादेश अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलेल, अशी आम्हाला आशा !’

बांगलादेशात हिंदूंचे संरक्षण करण्यात येत आहे, असे कोणतेच चित्र दिसून आलेले नाही. त्यामुळे अशी आशा ठेवणे हास्यास्पद आहे ! भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !

Foreign Minister S. Jaishankar : युरोपीय नेते भारताला रशिया आणि युक्रेन यांच्याशी चर्चा चालू ठेवण्यास सांगत आहेत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

रशिया-युक्रेन युद्धामुळे १२५ देश पीडित झाले आहेत. युद्धामुळे विकसनशील देशांना महागाई, अन्न, इंधन आणि खतांच्या चढ्या किमतींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही आठवडे मी युरोपीय नेत्यांनाही याविषयी बोलतांना पाहिले आहे.

S Jaishankar On Uri N Balakot Attacks : आम्ही उरी आणि बालाकोट येथील आक्रमणांनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले !

भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही, हे काही प्रमाणात सत्य असले, तरी अद्याप काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट झालेला नाही आणि पाकिस्तानकडून आतंकवाद्यांना पाठवणे चालूच आहे. यांत पालट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

Trump Warns BRICS Countries : ‘ब्रिक्‍स’ देशांनी नवीन चलन आणल्‍यास त्‍यांना अमेरिकी बाजारपेठेत उत्‍पादने विक्री करण्‍यास बंदी घालू ! – डॉनल्‍ड ट्रम्‍प

जो देश किंवा जागतिक संघटना अमेरिकेला तिची स्‍पर्धक वाटते, त्‍यांना संपवण्‍यासाठी किंवा त्‍यांची गळचेपी करण्‍यासाठी अमेरिका विविध कृती करते. ट्रम्‍प यांनी दिलेल्‍या चेतवणीवरून हे दिसून येते. असा देश भारताचा कधीतरी भारताचा मित्र होऊ शकतो का ?

संपादकीय : पुन्हा एकदा रोखठोक ! 

आधीच्या सरकारांनी ‘शांतीची कबुतरे’ उडवण्याचेच काम केले. त्याच्या पलीकडे जाऊन ‘राष्ट्रासाठी काही तरी करायला हवे’, ‘अरे’ला ‘कारे’ म्हणायला हवे, हेच मुळात कुणी कार्यवाहीत आणले नाही. त्यामुळे ‘कुणीही यावे आणि भारताला टपली मारून जावे’, अशी गत देशाची झाली होती.

ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.

Canada Allegations On Narendra Modi : (म्‍हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या कटाची माहिती होती !’ – कॅनडाचा आरोप

कॅनडाकडून आता मर्यादाचे उल्लंघन होत असल्‍याने भारताने कठोर निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आहे. कॅनडावर भारताने संपूर्ण बहिष्‍कार घालत त्‍याच्‍याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजेत !

Talks On India-China Air Services : जी-२० शिखर परिषदेत भारत-चीन थेट विमानसेवा चालू करण्‍याविषयी चर्चा !

मानसरोवर यात्रा पुन्‍हा चालू होण्‍याची शक्‍यता

Khalistan Referendum In New Zealand : कॅनडानंतर न्यूझीलंडमध्ये ‘खलिस्तान’साठी खलिस्तान्यांकडून जनमत चाचणी !

स्थानिक लोकांनी विरोध करत देशातून निघून जाण्याची चेतावणी

भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते, तर जागतिक बाजार नष्ट झाला असता ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारताचे रशियासमवेतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा प्रारंभ करण्यास साहाय्य करू शकतात. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत.