रशियामध्ये लहान मुलांवर बलात्कार करणार्‍यांना उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक येथील कारागृहात ठेवणार !

या कायद्याला पुढील मासामध्ये संसदेमध्ये संमती मिळण्याची शक्यता आहे. आर्क्टिक येथे गोठवणारी थंडी असून तेथे उणे तापमान असते.

रशियाने आक्रमण केल्यास निर्णायक कारवाई !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश निर्णायक कारवाई करतील, असा दिलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांना दिला.

महंमद पैगंबर यांचा अवमान करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही ! – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन

धर्मांधांकडून हिंदूंसह, शीख, ख्रिस्ती आदी धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यांच्यावर घाला घातला जात आहे. याचाही जगभरातून प्रखर विरोध झाला पाहिजे !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील ! – अमेरिका

रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर त्याचे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना चेतावणी दिली. बायडेन यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची शक्यता

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.

अफगाणिस्तानला साहाय्य करण्यावर एकमत !

अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारताच्या पुढाकाराने भारतासह ८ देशांची बैठक येथे १० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आली होती.

(म्हणे) ‘आगामी काळात भारतीय सैन्य रशियाच्या साहाय्याविना पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही !’ – अमेरिकेतील एका संस्थेच्या अहवालातील मत

भारतीय सैन्याला न्यून लेखणार्‍यांची सरकारने कानउघाडणी केली पाहिजे !

रशियामध्ये एकाच दिवसात ३५ सहस्र ६६० जण कोरोनाबाधित !

रशियात दिवसभरात १ सहस्र ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत २ लाख ३० सहस्र ६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तालिबानला आतंकवादी संघटनेच्या सूचीतून बाहेर काढण्याविषयी विचार करू ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

असे झाल्यास, हा भारतासाठी धोकादायक निर्णय ठरेल ! त्यामुळे भारताचा ‘मित्रराष्ट्र’ असलेल्या रशियाला भारत यापासून परावृत्त करेल का ?

अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारताकडून आयोजित बैठकीसाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान यांना आमंत्रण

भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत.