महानगरपालिकेतील मुसलमान सरकारी कर्मचार्याच्या घरावर धाड
नाशिक – येथील मालेगावात अंमलबजावणी संचालनालयाने एकाच वेळी ९ ठिकाणी धाडी घातल्या. बांगलादेशी घुसखोरांना बेकायदेशीररित्या सरकारी ओळखपत्रे पुरवल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. बांगलादेशी घुसखोरांना बोगस जन्म दाखला दिल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तव्वाब शेख यांच्या घरी ईडीने धाड घातली. या वेळी मनी लाँड्रिंगचा (काळ्या पैशांचे पांढर्या पैशांत रूपांतर करणे) गुन्हा नोंदवण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांनी या संदर्भात १६ तक्रारी प्रविष्ट केल्या. तव्वाब शेख हे मालेगाव महानगरपालिकेत जन्म-मृत्यू विभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या घरी ईडीने धाड घातली. (बांगलादेशी घुसखोरांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच रेशनकार्ड कोण पुरवते, हे यावरून लक्षात येते ! प्रशासनातील अशांवर प्रथम कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाराज्यात सर्वत्र अशा प्रकारे धाडी घालून बांगलादेशी घुसखोर आणि त्यांना साहाय्य करणारे यांना भारतातून कायमचे हाकलून द्यायला हवे ! |