राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ११.४.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

पोलीस नांदेड येथील प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करतील !

शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्‍या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले असून या प्रकरणामध्ये १४ पोलीस घायाळ झाले आहेत. 

नांदेड येथे शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

पोलिसांवर वारंवार होणारी आक्रमणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने चिंताजनक !

नांदेडमधील हिंसाचार !

धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’कडून संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी !

संयुक्त राष्ट्रांनी जिहादी आतंकवादी संघटनेकडून पैसे स्वीकारणे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी बलाढ्य देशांना मान्य आहे का ? या संघटनेचे खरे स्वरूप उघड झाल्यावर ही संघटनाच बरखास्त करण्याची मागणी भारताने लावून धरणे आवश्यक !

शीख तरुणाशी विवाह करणार्‍या मुसलमान तरुणीला सासरच्या घरातून पळवून नेण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न

फतेहगड साहिब (पंजाब) येथील मंडी गोबिंदगडमध्ये एका शीख तरुणाशी विवाह केलेल्या जम्मू-काश्मीरमधील मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी या तरुणाच्या घरातून उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

दंगल पीडित मुसलमानांना साहाय्य; मात्र पीडित हिंदूंना साहाय्य करण्यास टाळाटाळ

आम आदमी पक्षाचे सरकार आणि शिखांची ‘खालसा’ संघटना यांचा हिंदुद्वेष ! निधर्मीवादी आम आदमी पक्षाच्या सरकारचा हिंदुद्वेष ! असे सरकार राज्यघटनेचे आणि मानवाधिकाराचेही उल्लंघन करत आहे ! याविषयी आता कुणी का बोलत नाही ?

(म्हणे) ‘महाराष्ट्र आणि बंगाल यांना स्वतंत्र देश घोषित करा !’

पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा, वजिरीस्तान आदी स्वतंत्र देश करण्यासाठी खलिस्तानी का प्रयत्न करत नाहीत ?

७१ वर्षांत शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे न करणारे विद्यमान विरोधी पक्ष आणि मवाळ धोरणे अवलंबून शेतकरी आंदोलनाचा विषय चिघळू देणारे विद्यमान सत्ताधारी !

आज ७० दिवस झाल्यानंतरही हे आंदोलन जाणीवपूर्वक चालू ठेवले आहे. ‘देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने अशी आंदोलने कठोरपणे मोडून काढावीत.