लडाख सीमेवर भारतच मागे जात असून चीन पुढे सरकत आहे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा दावा

एका ट्विटर वापरकर्त्याने वापरकर्त्याने एक अहवाल सादर केला असून यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. स्वामी यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ करा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारने स्वतःहून असे पालट करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

कोरोनाच्या विरोधातील युद्धाचे दायित्व नितीन गडकरी यांना द्या !  

इस्लामी आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद यांना भारत पुरून उरला. त्याप्रमारणे कोरोना महामारीलाही भारत सामोरे जाईल. आता कडक उपाययोजना न केल्यास आपल्याला आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल.

पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा नियंत्रण मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे, हे आता विसरून जा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली होती.

हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ असलेल्या ज्वालामुखी मंदिरामध्ये मुसलमान अधिकार्‍यांची नियुक्ती ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

३० डिसेंबर २००७ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. तिने जर या शक्तीपीठात अहिंदूंची नियुक्ती केली असेल, तर हिंदूंनी आणि आताच्या भाजप सरकारने तिला जाब विचारणे आवश्यक !

‘अहमदाबाद’चे नाव ‘कर्णावती’ का नाही ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

गेली १५ वर्षांहून अधिक काळ गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अद्याप अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ का झाले नाही ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे, त्यात चुकीचे काय ?

रामाच्या देशात पेट्रोल महाग, तर सीता आणि रावण यांच्या देशात स्वस्त ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी यापूर्वीही पेट्रोल दर वाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

प्रतिलिटर पेट्रोलचे मूल्य ४० रुपये असले पाहिजे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

९० रुपये मूल्य असणार्‍या प्रतिलिटर पेट्रोलमध्ये त्याचे मूळ मूल्य केवळ ३० रुपये असते; मात्र त्यानंतर विविध कर, पेट्रोल पंपचे कमिशन आणि अन्य खर्च ६० रुपये असतो. त्यामुळे त्याचे मूल्य ९० रुपये होते.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी काँग्रेसवर केलेला आरोप जाणा !

मुंबईवरील २६/११ चे आतंकवादी आक्रमण तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पाकिस्तानी सैन्य यांनी हिंदुत्वाला झटका देण्यासाठी संयुक्तरित्या केलेले आक्रमण होते. यात काँग्रेसचे ४ नेते सहभागी होते, असा दावा भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे.