Rajiv Gandhi Cambrijdge Performance : केंब्रिज विश्‍वविद्यालयात अनुत्तीर्ण झालेले राजीव गांधी पंतप्रधान कसे होऊ शकतात ? – काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचाच प्रश्‍न

डावीकडे काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर आणि राजीव गांधी

नवी देहली – राजीव गांधी हे विमान वाहतूक आस्थापनात वैमानिक होते. ते केंब्रिज विश्‍वविद्यालयातील शिक्षणात दोनदा अनुत्तीर्ण झाले. केंब्रिजमध्ये अनुत्तीर्ण होणे खूप कठीण आहे. कारण विश्‍वविद्यालय सर्वांना उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्याला त्याचे आचरण स्वच्छ ठेवावे लागते. तरीही, राजीव गांधी अपयशी ठरले. इतकेच नाही, तर राजीव गांधी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्येही अनुत्तीर्ण झाले होते.

अशी व्यक्ती देशाची पंतप्रधान कशी होऊ शकते ?, असा प्रश्‍न काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत केला. भाजप नेते अमित मालवीय यांनी या मुलाखतीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

संपादकीय भूमिका

अय्यर यांना हा प्रश्‍न ४० वर्षांनंतर कसा पडला ? यापूर्वी त्यांना याची माहिती नव्हती कि बोलण्याचे धाडस नव्हते ?