२ शिक्षकांवर गुन्हा नोंद !
बुलढाणा – जिल्ह्यातील मलकापूर येथे मुलाला चांगले गुण देण्याचे आमीष दाखवत २ शिक्षकांनी वर्ष २०२४-२०२५ मध्ये मुलाच्या ३४ वर्षीय आईवर अनेकदा अत्याचार केले. या प्रकरणी २ शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. साहाय्यक शिक्षक समाधान इंगळे (वय ४५ वर्षे) आणि साहाय्यक शिक्षक अनिल थाटे (वय ४७ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, पीडित महिला मूळ मोताळा तालुक्यातील असून मुलांच्या शिक्षणासाठी मलकापूर येथे वास्तव्यास आली होती. इंगळे हा तिच्या मुलाचा वर्गशिक्षक आहे. शैक्षणिक प्रगतीचे आमीष दाखवून दोघांनीही तिला शारीरिक संबंधासाठी भाग पाडले. नकार दिल्यास मुलाला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली. सततच्या त्रासामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलेने धैर्य दाखवत मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअसे वासंनाध शिक्षक कधीतरी आदर्श विद्यार्थी घडवतील का ? मुलांना सर्वाेत्तम ज्ञान देऊन त्यांना आदर्श बनवण्याऐवजी असे घृणास्पद कृत्य करणार्या अशा शिक्षकांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! |