अनैतिक प्रकार चालू असलेल्या कॅफेवर भाजपच्या महिला आमदाराची धाड !

  • नाशिकसारख्या सांस्कृतिक शहरातील लांच्छनास्पद प्रकार !

  • अश्लील चाळे करणारे मुले-मुली कह्यात

नाशिक – येथील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः ‘अ’मोगली कॅफेवर धाड घातली. त्या वेळी तेथे अनैतिक प्रकार चालू असल्याचे उघड झाले. त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली होती. आमदार आल्याने पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी अश्लील चाळे करणार्‍या अनेक मुला-मुलींना कह्यात घेतले.

या ‘कॅफे’मध्ये तासांनुसार दर आकारले जातात. अंधार करून पडदे लावण्यात येतात. तरुण मुला-मुलींना १०० ते २०० रुपयांत खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही समोर आले. पोलीस संबंधित मुला-मुलींच्या पालकांना बोलावून समज देणार आहेत.

संपादकीय भूमिका

आमदारांवर धाड घालण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून ही कारवाई का करत नाहीत ?