Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाची अपर्कीती करणार्‍या ५४ सामाजिक माध्यमांच्या विरोधात गुन्हे नोंद !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • सामाजिक माध्यमांवर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ पोस्ट करून अफवा पसरवली !

  • ७ फेसबूक, ५ इन्स्टाग्राम, ९ एक्स आणि एका यू ट्यूब वाहिनीवर कारवाई !

प्रयागराज, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – एकीकडे ‘महाकुंभ २०२५’चे जगभर कौतुक होत असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून सनातन धर्माच्या सर्वांत मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अशा महाकुंभ मेळाव्याची अपर्कीती करण्यात येत आहे. अशी अपर्कीती करणार्‍या ५४ सामाजिक माध्यमांवर उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या सामाजिक माध्यमांवर महाकुंभाविषयी दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ पोस्ट करून अफवा पसरवली जात होती. या माध्यमांमध्ये ७ फेसबूक, ५ इन्स्टाग्राम, ९ एक्स आणि एका यू ट्यूब वाहिनीचा समावेश आहे.


१. १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सामाजिक माध्यमे निरीक्षणाच्या वेळी महाकुंभशी जोडून दिशाभूल करणार्‍या २ व्हिडिओंची पोलिसांनी विशेष नोंद घेतली. यामध्ये ‘इजिप्तमधील आग दाखवून ती महाकुंभाच्या ठिकाणी लागलेली आग’ असे दाखवण्यात आले होते. यांतील दृश्ये ही वर्ष २०२० मध्ये इजिप्तमधील तेल जलवाहिनी दुर्घटनेचा होता. ही आग दाखवून ‘महाकुंभक्षेत्री असलेल्या बसस्थानकाला आग लागली, ४०-५० वाहने जळून खाक झाली’, असे प्रसारित करण्यात आले होते. ही अफवा पसरवणार्‍या ७ सामाजिक माध्यमांवर कोतवाली कुंभमेळा ठाण्यात गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.

२. दुसर्‍या व्हिडिओमध्ये पाटणा येथील घटनेचा संबंध महाकुंभाशी जोडण्यात आला आहे. हा व्हिडिओ बिहारमधील एका चित्रपट महोत्सवात झालेल्या अव्यवस्थेचा होता. याचा संबंध महाकुंभशी जोडून महाकुंभमध्ये राष्ट्रवादी लोकांनी भारतीय सैनिकांवर चप्पल फेकल्याची अफवा पसरवली होती. ही पोस्ट प्रसारित करणारी १५ सामाजिक माध्यमांची खाती ओळखण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

इजिप्तच्या घटनेला महाकुंभ २०२५ शी जोडणार्‍या पुढील सामाजिक माध्यमांच्या खात्यांवर कारवाई करण्यात आली…

१. इंडिया विथ काँग्रेस (India With Congress @UWCforYouth) X Twitter
२. हरिंद्र कुमार राव (Harindra Kumar Rao @kumar.harindra.rao) इंस्टाग्राम
३. अनिल पटेल  (Anil Patel @_1_4_3_anil_patel) इंस्टाग्राम
४. विशाल बाबू  (Vishal Babu @a.v.r_rider_0) इंस्टाग्राम
५. नेमी चंद  (@nemichand.kumawat.2022) इंस्टाग्राम
६. सिफा भदोरिया  (Sifa Bhadoriya@bhadoriya6285) इंस्टाग्राम
७. हॅलो प्रयागराज  Hello prayagraj (@Hello_Prayagraj) यू-ट्यूब वाहिनी

पाटणा घटनेला ‘महाकुंभ’ असे वर्णन करणार्‍या खालील सामाजिक माध्यमांवर कारवाई करण्यात आली…

१. इंद्रजीत बरक  Inderjeet Barak (@inderjeetbarak) X Twitter
२. सुनील  SUNIL (@sunil1997_) X Twitter
३. निहाल शेख  Nihal Shaikh @mr_nihal_sheikh X Twitter
४. डिम्पी  Dimpi (@Dimpi77806999) X Twitter
५. सत्सेवा  Sat Sewa (@lalitjawla76) X Twitter
६. संदेश वाटक बातम्या Sandesh Vatak News@Sandeshvataksv) X Twitter
७. लोकेश मीना lokesh meena (@LOKESHMEEN46402) X Twitter
८. राज सिंह चौधरी @RajSingh_Jakhar X Twitter
९. युनूस आलम (फेसबुक खाते)
१०. अमिनुद्दीन सिद्दीकी (फेसबुक खाते)
११. अरविंद सिंग यादव अहिरवाल (फेसबुक खाते)
१२. शिवम कुमार कुशवाह (फेसबुक खाते)
१३. जैन रेणू (फेसबुक खाते)
१४. अमित कुमार – २ (फेसबुक खाते)
१५. मेहतर एक योद्धा बलिया (फेसबुक खाते)

यापूर्वीही बनावट पोस्ट प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या १ मासात महाकुंभमेळ्याची अपर्कीती करून विविध प्रकारची दिशाभूल करणार्‍या पोस्ट आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते, त्यांतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे आहेत…

१. १३ जानेवारी २०२५ : एका एक्स अकाउंटने अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी करण्यात येत असलेल्या रंगित तालिमीचा व्हिडिओ प्रसारित करून ती आगीची खरी घटना म्हणून वर्णन केली.

२. २ फेब्रुवारी २०२५ : नेपाळचा जुना व्हिडिओ पोस्ट करून त्याद्वारे महाकुंभात चेंगराचेंगरी झाली आहे, असा व्हिडिओ दाखवण्यात आला.

३. ७ फेब्रुवारी २०२५ : संगम परिसरात भाविकांची गर्दी असतांना तेथे चेंगराचेंगरीच्या रूपात दाखवणार्‍या फेसबुक अकाउंटवर गुन्हा नोंद.

४. १२ फेब्रुवारी २०२५ : गाझीपूर येथे सापडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे महाकुंभामध्ये असेलेल्या चेंगराचेंगरीतील आहेत, असे दाखवणार्‍या ७ खात्यांवर कारवाई.