Wikipedia Offensive Writing On Chhatrapati Sambhaji Maharaj : लिखाण काढून टाकण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश !

  • छत्रपती संभाजी महाराजांविषयी ‘विकीपीडिया’वर आक्षेपार्ह लिखाण !

  • ऐतिहासिक गोष्टी मांडण्याची नियमावली सिद्ध करण्यास सांगणार !

मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांविषयी ‘विकीपीडिया’वर आक्षेपार्ह लिखाण आढळले. या प्रकरणी ते लिखाण काढून टाकण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. असे लिखाण केले गेल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.

माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘विकीपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. यासंदर्भात ‘तात्काळ विकीपीडिया आणि संबंधित यंत्रणांशी बोलणी करावी अन् ते लिखाण हटवण्यास सांगावे’, असे मी महाराष्ट्रातील सायबर विभागाच्या प्रमुखांना सांगितले आहे. यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल, ती करावी; पण अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण मुक्त स्रोतांवर रहाणे चुकीचे आहे. त्यामुळे तिथून ते काढण्याच्या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’’

ते पुढे म्हणाले,…

१. विकीपीडिया हे भारतातून संचालित होत नाही. हा एक मुक्त स्रोत आहे. त्याचे काही नियम असून त्या नियमांनुसार तिथे लिहिण्याविषयीचे अधिकार काही लोकांना असतात; परंतु ऐतिहासिक गोष्टींना चुकीच्या पद्धतीने लिहिणे योग्य नसून याची एक नियमावली सिद्ध करण्यास त्यांना सांगण्यात येईल. पूर्वी सामाजिक माध्यमांची भौगोलिक चौकट असल्याने नियम करणे सोपे होते; परंतु आता ही चौकट उरलेली नसल्याने त्याची नियमावली करणे कठीण आहे. आम्ही केंद्र सरकारशीसुद्धा यासंदर्भात चर्चा करत आहोत.

२. प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे; पण त्याचीसुद्धा सीमा आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून दुसर्‍यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही. त्यामुळे जिथे अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई करणे आवश्यक आहे.

‘विकीपीडिया’मधील काही आक्षेपार्ह माहिती

१. छत्रपती संभाजी महाराज हे चारित्र्यहीन आणि व्यसनी होत.

२. त्यांनी ब्राह्मण स्त्रीवर अत्याचार केला.

३. त्यांनी मोगलांशी हातमिळवणी केली.

४. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना छत्रपतीच्या गादीवर बसवायचे नव्हते.