संकुचित मानसिकता !

‘बौद्ध कायदा होण्यासाठी येणार्‍या काळात आपल्या विचारांचे खासदार लोकसभेत पाठवा’, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी एका परिषदेत बोलतांना केले. बौद्ध कायदा देशात लागू करावा, असे त्यांना का वाटते ?

बौद्ध कायदा संसदेत मांडण्यासाठी आपल्या विचारांचे खासदार लोकसभेत पाठवा ! – भीमराव आंबेडकर

बौद्ध कायदा होण्यासाठी अनेक वर्षे आपण मागणी करत आहोत; परंतु आपले विधेयक संसदेत मांडण्यासाठी खासदार नाहीत. बौद्ध कायदा होण्यासाठी येणार्‍या काळात आपल्या विचारांचे खासदार लोकसभेत पाठवा….

कल्याण येथील कार्यक्रमात हिंदु दांपत्याचे जाहीरपणे बौद्ध धर्मात धर्मांतर !

‘बुद्धभूमी फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात पुण्यातील एका हिंदु दांपत्याला धर्मांतरित करून त्याला बौद्ध पंथाची दीक्षा २८ डिसेंबरला देण्यात आली आहे.

मंदिरात पूजा करण्यास विरोध झाल्याने अनुसूचित जातीच्या ५० हून अधिक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला

येथील हनुमान मंदिरात पूजा करण्यास पुजार्‍याने विरोध केल्याने या परिसरातील ५० हून अधिक अनुसूचित जातीच्या लोकांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

बौद्ध शिक्षक २५ वर्षांपासून महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती होती ! – तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा

अनेक बौद्ध शिक्षक महिलांचे लैंगिक शोषण करतात, हे मला वर्ष १९९० पासून ठाऊक आहे, असा गौप्यस्फोट तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी नेदरलॅण्डच्या दौर्‍याच्या वेळी केला.

अयोध्येतील राममंदिराच्या जागेवर बौद्धांचा दावा

अयोध्येतील राममंदिराच्या जागेवर हिंदु आणि मुसलमान यांच्या पाठोपाठ आता बौद्धांनी दावा केला आहे. अयोध्येत रहाणारे विनीत कुमार मौर्य यांच्यासह बौद्ध समाजातील काही लोकांनी वरील दाव्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे

मागासवर्गियांच्याच घरी केवळ भोजन न करता त्यांना स्वतःच्या घरीही बोलवा ! – रा.स्व. संघाने भाजप नेत्यांना फटकारले

अष्टमीच्या दिवशी मागासवर्गीय समाजातील मुलींना घरी बोलावून आपण त्यांची पूजा करतो; पण आपण आपल्या मुलींना कधी त्यांच्या घरी पाठवतो का ? दोन्ही बाजूंनी व्यवहार झाला,

गुजरातमध्ये ३०० मागासवर्गियांकडून बौद्ध धर्माचा स्वीकार

येथे दोन वर्षांपूर्वी गोरक्षणाच्या कथित घटनेवरून मागासवर्गियांवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता त्यातील एका परिवारास ३०० मागासवर्गियांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

श्रीलंकेतील बौद्ध आणि मुसलमान पंथातील संघर्षाची १० कारणे

श्रीलंकेतील कँडी या ठिकाणी उसळलेल्या दंगलीनंतर तेथील सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. ‘बौद्ध’ पंथ हा शांतताप्रिय आहे’, असे म्हटले जाते. तरीही ‘श्रीलंकेत बौद्ध आणि मुसलमान या दोन्ही पंथांमध्ये संघर्ष का उसळला ?’, ‘श्रीलंकेत संचारबंदी, जमावबंदी आणि आणीबाणी का लागू करण्यात आली ?’

श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now