विद्यमान मंत्र्यांना प्रतिष्‍ठेची खाती न मिळाल्‍याने जुने स्‍वीय साहाय्‍यक सोडून गेले !

राज्‍यात मंत्र्यांच्‍या खातेवाटप पार पडले; पण प्रतिष्‍ठेची खाती विद्यमान मंत्र्यांना न मिळाल्‍याने आधीच्‍या सरकारमधील मंत्र्यांचे जुने स्‍वीय साहाय्‍यक सोडून गेले आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या मूळ विभागाच्‍या नियुक्‍तीवर जाण्‍यास प्राधान्‍य दिले.

अन्‍वेषणावर न्‍यायालयाने देखरेख ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणात २ पसार आरोपींविषयी अन्‍वेषण वगळता कॉ. पानसरे यांच्‍या हत्‍येच्‍या सर्व पैलूंनी अन्‍वेषण झाले आहे. त्‍यामुळे या अन्‍वेषणावर न्‍यायालयाने देखरेख ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही, असे न्‍यायालयाने २ जानेवारी या दिवशी स्‍पष्‍ट केले.

भाडे नाकारणार्‍या रिक्शा व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल ! – कुडाळ पोलीस

कोणत्याही प्रवाशाला तुम्ही भाडे नाकारू शकत नाही. भाडे नाकारल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रिक्शा व्यावसायिकांच्या बैठकीत  सांगितले.

अंमलबजावणी संचालनालयाने आणखी २० भूमींची कागदपत्रे घेतली कह्यात

बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करतांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’ने) आणखी २० भूमींची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत.

एका रात्रीत २ सहस्र ६३३ बेशिस्‍त वाहनचालकांकडून २० लाख रुपयांचा दंड वसूल !

१ जानेवारीच्‍या मध्‍यरात्री पोलिसांनी बेशिस्‍त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. १ जानेवारीच्‍या पूर्वसंध्‍येला वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची पडताळणी केली.

गोव्यात पर्यटकांची संख्या उणावल्याचा प्रचार खोटा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सामाजिक माध्यमांत प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती गोव्यात पर्यटक उणावल्याचा खोटा प्रचार करत आहेत. वास्तविक गोव्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर मासांत पूर्वीप्रमाणेच अधिक पर्यटक आले अन् जानेवारी मासामध्येही अधिक पर्यटक येणार आहेत.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पार्ट्यांमधून हणजूण-वागातोर येथे ध्वनीप्रदूषण

प्रशासनातील अनेकांचे आयोजकांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ध्वनीप्रदूषणावर कारवाई होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !

वर्ष अखेरीस सिंहगडाच्‍या पायथ्‍याशी गडरक्षण मोहीम !

युवकांकडून गडाचे पावित्र्यभंग होऊ नये, गडदुर्ग आणि संरक्षित स्‍मारके यांच्‍या पावित्र्य रक्षणासाठी कार्यरत ‘राजे शिवराय प्रतिष्‍ठान’कडून वन विभागाच्‍या सहभागातून ३१ डिसेंबर या दिवशी सिंहगडाच्‍या पायथ्‍याशी ‘गडरक्षण मोहीम’ राबवण्‍यात आली.

डॉ. जी.ए. रत्नपारखी राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित !

येथील ज्‍येष्‍ठ ज्‍योतिष अभ्‍यासक डॉ. जी.ए. रत्नपारखी यांना उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे ‘ज्‍योतिष महाकुंभ परिषदे’त मुख्‍यमंत्री पुष्‍करसिंह धामी यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. पुरस्‍काराचे स्‍वरूप आकर्षक ….

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मालकाकडून अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार !; तरुणाकडून आई-वडिलांची हत्‍या !…

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी आस्‍थापनाच्‍या कार्यालयात आणि गच्‍चीवर ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून फरार आरोपीचा शोध चालू आहे.