
लोणी काळभोर (पुणे) – इयत्ता १२ वीच्या वर्गात शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलीशी ‘इन्स्टाग्राम’वरून मैत्री करून धर्मांध साहिल शेख याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. घरी बोलावून छेडछाड करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार केल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी धर्मांध साहिल शेख याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवस्ती परिसरात घडली. आरोपी साहिल याच्यावर यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले होते. (गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीवर कडक कारवाई करणे अपेक्षित होते ! – संपादक)
पीडिता ही कुटुंबासमवेत मोरेवस्ती येथे रहाते. आरोपीने मैत्री करून तिला घरी बोलावून विनयभंग केला. पीडितेने घडलेली घटना घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी त्याला विरोध केला. तेव्हा पीडितेने आरोपी साहिल याच्याशी बोलणे बंद केले. पीडिता आपल्याला टाळत असल्याचा राग मनात धरून १७ जानेवारी या दिवशी भ्रमणभाष करत ‘तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही, तर मी पंख्याला फाशी घेईन. तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन. माझ्याकडे आपले चित्रफीती आहेत, त्या ‘व्हायरल’ (समाज माध्यमांवर प्रसारित करणे) करीन’ अशी धमकी दिली. ही घटना फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडली.
संपादकीय भूमिका :या लव्ह जिहाद प्रकरणाची तशी नोंद पोलीस ठाण्यात व्हायला हवी ! |