खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या आस्थापनांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार ! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व आस्थापनांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन !

सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे हे प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात गेले होते. कडाक्याच्या थंडीत गंगास्नान करतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती परिसराचे होणार सुशोभीकरण !

शहरातील दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती आहे. या परिसराचे सुशोभीकरण कराड नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली.

खेळामुळे संघर्षाला तोंड देण्याची शक्ती मिळते ! – जयकुमार गोरे, ग्रामविकासमंत्री

खेळामुळे आत्मविश्वासासमवेत आंतरिक शक्ती मिळते. यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देता येते. ग्राम विकास विभागाच्या जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवर क्रीडा स्पर्धांचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नायलॉन मांजा गळ्यात अडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू !

आणखी किती मृत्यू झाल्यावर नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई होणार आहे ?

औषध वितरकांची देयके टप्प्याटप्प्याने संमत करणार !

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरीय रुग्णालये येथे निर्माण होणार असलेली औषधांची आणीबाणी टळली.

‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवसा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन !

महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण, तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १ सहस्र स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार ! – गणेश नाईक, वनमंत्री

गणेश नाईक म्हणाले की, विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार, हा विश्वास आहे; कारण नामकरण चळवळ सर्वांनीच मनावर घेतली आहे.

मणीपूरमधील विस्थापितांना पुणे परिवाराकडून साहाय्य !

मणीपूरमधील हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना साहाय्य म्हणून ‘वसुधैव कुटुंबकम’ या नात्याने पुणे परिवार संस्थेने साहाय्याचा हात पुढे केला आहे.

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

महाराष्ट्र शासनाने बेळगाव, भालकी, निपाणी, बिदर यांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावीत यासाठी सर्वाेच्च न्यायालयात २९ मार्च २००४ या दिवशी खटला प्रविष्ट केला आहे.