श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीसमोर पानिपत रणसंग्रामातील विरांना मानवंदना !
पानिपत रणसंग्रामातील वीरांना मानवंदना देण्यासाठी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीसमोर झालेल्या ‘दीपवंदना’ कार्यक्रमात उपस्थितांनी शेकडो दीप प्रज्वलित करून मानवंदना दिली. या वेळी इतिहासतज्ञ मोहन शेटे, सावरकरप्रेमी विद्याधर नारगोलकर, रमेश भागवत, सुधीर थोरात यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.