१४ लाख ४६ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त

मिरज – सांगली, मिरज शहरात अमली पदार्थासारख्या नशेच्या गोळ्या विकणार्या तिघांना महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख १६ सहस्र रुपयांच्या गोळ्या, ८ लाख ३० सहस्र रुपयांची चारचाकी आणि दुचाकी असा १४ लाख ४६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मिरज येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर उद्यानाच्या परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत रोहित कागवाडे, ओंकार मुळे, अश्पाक पटवेगार यांना अटक करण्यात आली आहे.