देशाच्या एकतेला आव्हान देणार्‍यांना प्रत्युत्तर देऊ ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिना’चा कार्यक्रम : देशाच्या एकतेला आव्हान देणार्‍यांना प्रत्युत्तर देऊ, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ३१ ऑक्टोबरला येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिना’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.