कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत इस्लामचा द्वेष करणारे विधान केल्याच्या प्रकरणी गालागोदाते ज्ञानसारा (वय ४९ वर्षे) या बौद्ध भिक्खूला (साधूला) ४ वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वर्ष २०१६ मध्ये या साधूने विधान केले होते. त्यावरून त्यांनी क्षमाही मागितली होती.
वर्ष २०१२ पासून मुसलमानांच्या विरोधात गालागोदाते ज्ञानसारा मोहीम राबवत होते. मार्च २०१६ मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी इस्लामच्या विरोधात विधाने केली होती. वर्ष २०१८ मध्ये ज्ञानसारा यांना अटक करण्यात आली होती; मात्र नंतर त्यांना राष्ट्रपतींकडून क्षमा करण्यात आली होती.