सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची महाकुंभ तीर्थयात्रा !

प्रयागराज – ‘विश्वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या धर्मसंस्थापनेच्या उद्देशाने तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते संकल्पपूजन अन् प्रार्थना करण्यात आली. या वेळी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातनचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे देहधारी अस्तित्व असणे आवश्यक असल्याने त्यांना आयुर्आरोग्य लाभावे’, यासाठीही या वेळी प्रार्थना करण्यात आली.
प्राचीन अक्षय्यवटाचे घेतले भावपूर्ण दर्शन !
यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील प्राचीन अक्षय्यवटाचे भावपूर्ण दर्शन घेतले.